Ahmednagar News : बँक खात्याचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका तोतया बैंक प्रतिनिधीने जिल्हा न्यायालयातील वकील व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून एक लाख ९२ हजार ५० रूपये लंपास केले.
संबंधीत वकीलाने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वकिलाला एका अनोळखी मोबाईल नंबरवरून टेक्स मेसेज आला व त्याच नंबरवरून नंतर फोन आला.
‘मी आकाश अॅक्सिस बँकेचा प्रतिनिधी बोलतोय तुमचे खाते एक तास्वत ब्लॉक होईल. ते चालू ठेवण्यासाठी तुमचे केवायसी अपडेट करावे लागेल. त्याची माहिती तुम्ही द्या’, असे त्याने सांगितले.
फिर्यादीने त्याला त्यांच्या पॅनकार्ड, आधारकार्डची माहिती दिली. त्या व्यक्तीने फिर्यादीच्या बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल नंबर बदलून त्या खात्याला दुसरा मोबाईल नंबर लिंक केला. त्यानंतर वकीलपत पत्नीच्या बँक खात्यातून १ लाख १२ हजार ५०० रूपये काढून घेत फसवणूक केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.