108 रुग्णवाहिका चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन राज्यातील ॲम्बुलन्स चालकांना समान काम समान वेतन देण्याची मागणी.

Published on -

नगर (प्रतिनिधी)- राज्यातील 108 ॲम्बुलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे. त्यांच्या समस्यांबाबत 13 मे 2025 रोजी आझाद मैदान मध्ये आंदोलन करून निवेदन दिले होते त्यावेळी 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत शासनाने व बीव्हीजी कंपनीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले गेले

मात्र कोणतीही कारवाई झाली नसून राज्यातील 108 ॲम्बुलन्स चालकांचा काम बंद आंदोलन सुरू करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना 108 रुग्णवाहिका चालक युनियन संघटनेचे अध्यक्ष अशोक कराळे,

उपाध्यक्ष अतुल शिंदे, संजय दरवडे, सतीश शिरसाठ, नितीन चेमटे, शरद अस्वर, संजय ओहोळकर, राहुल वाकचौरे, वाल्मीक शितोळे, संतोष चौधरी, भीमराज मोकाटे, जगन्नाथ खेमनार, आप्पासाहेब झुंबड, किशोर घनवट, सुनील देशमुख, सोमनाथ बांडे आदीसह चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, सेवा पुरवठा बीव्हीजी कंपनी कडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. चालक संघटनेने ही सेवा बीव्हीजी कंपनी यांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती. 15 जून पर्यंत चर्चा करून मागण्याचे पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला होता.

परंतु 108 वाहनचालकांच्या मागण्यांबाबत कुठली हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे ॲम्बुलन्स चालकांमध्ये तीव्र असतो निर्माण होऊन त्यांच्या अल्प वेतनावर त्यांना काम करावे लागते व ॲम्बुलन्सची अवस्था अत्यंत वाईट असून ॲम्बुलन्सला आग लागून रुग्ण व वाहनचालकाचा जीवितास धोका निर्माण होईल

अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहे व वाहनचालकाकडून ज्यादा काम करून घेतले जाते परंतु त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही तसेच समान काम समान वेतन दिले पाहिजे व पीएफ 2014 ते 2017 पर्यंत कापलेल्या नसून तो मिळावा तसेच कोविड काळामध्ये ॲम्बुलन्स चालकांनी जीवावर उदार होऊन काम केले आहे

मात्र त्यांना कुविड भत्ता शासनाने कंपनीला देऊन देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेला नसून तो देण्यात यावा व रुग्णवाहिका चालक याला कोणताही सुरक्षा कवच विमा नसून विमा करण्यात यावा या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर निवेदन या पूर्वीच शासनाला व बीव्हीजी कंपनीला दिलेले आहे मात्र दुर्दैवाने कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही

त्यामुळे तातडीने कंपनी यांच्याबरोबर संघटनेचे संयुक्त बैठक बोलावून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय करावा अशी मागणी करण्यात आली आहे व रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गेले अनेक वर्ष मागण्या प्रलंबित असतानाही काम सुरू ठेवले आहे

परंतु आता बीव्हीजी कंपनी ही या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय रुग्णवाहिका चालक युनियनने घेतला असून लवकरात लवकर मागण्या मान्य करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!