अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- घरफोडून चोरट्यांनी 15 लाख रूपयांची रक्कम चोरून नेली. नगर शहरातील टिळक रोड परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मीना रूस्तुम शेख (वय 23) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या
फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीना शेख या टिळक रोड येथील पॅराडार्ईज हॉटेलमागे कुटुंबासह वास्तव्यास आहेत.
त्यांची बहिण हिना शेख या नगर शहरातील कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात कुटुंबासह राहतात. हिना शेख यांनी त्यांचे जुने घर विकून मिळालेले 11 लाख 50 हजार रूपये मीना शेख यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते.
तसेच मिना शेख यांनी बचत करून तीन लाख 50 हजार रूपये साठवले होते. अशाप्रकारे 15 लाख रूपयांची रोकड घरातील डब्ब्यामध्ये ठेवले होते.
फिर्यादी मिना शेख कामावर आणि त्यांचे आई-वडील बीडला गेले होते. त्यांनी घराला कुलूप लावली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप तोडून 15 लाखांची रोकड चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम