अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- संगमनेर मध्ये शहर पोलिसांनी बेकायदेशिररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून 1500 किलो गोवंश जातीचे जनावरांचे मांस जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime)
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील भारतनगर येथील अफसर कुरेशी याच्या वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तीन लाख रुपये किमतीचे 1500 किलो गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केले मांस आढळून आले. पोलिसांनी सदर मांस जप्त केले आहे.
याबाबत पोलीस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अफसर उमर कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर), अनिस गुलामहैदर कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर), अब्दुलसमद जावेद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम