जिल्ह्यातील हा 16 वर्षीय युवक बेपत्ता ! वडीलांनी केलय हे आवाहन…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  शिरेगाव ता.नेवासा येथील 16 वर्षीय युवक अभिषेक दिगंबर बोर्डे हा युवक 19 नोव्हेंबर 2021 रोजी बेपत्ता झाला आहे याचा शोध आजूबाजूला व नातेवाईकांकडे केला असता

आढळून आलेला नाही या युवकास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे असे युवकांचे वडील दिगंबर प्रेमलिग बोर्डे यांनी फिर्याद दिली आहे.

त्याचे वर्णन खालील प्रमाणे अभिषेक दिगंबर बोर्डे वय 16 वर्ष 6 महिने 13 दिवसाचा असून तो आर्या जूनियर कॉलेज मांजरी ता.राहुरी येथे 11 वी मध्ये शिक्षण घेत आहे

रंगाने गोरा असून उंची 5 फूट, शरीराने पातळ व गुलाबी रंगाचा टीशर्ट व काल्या रंगाची पॅंट पायात चप्पल काल्या रंगाची घातलेली आहे त्याचे वर्णन असून याबाबत कोणाला माहिती असेल

तर सोनई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाचे वडील दिगंबर प्रेमलिग बोर्डे मो. नं. 9529131974 / 8308746008. या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe