Ahmednagar Elections : अहमदनगर जिल्ह्यात १९४ ग्रामपंचायत निवडणुका !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Elections

Ahmednagar Elections : पुढील महिन्यात ९ तारखेपासून दिवाळी साजरी होणार आहे. परंतु तत्पूर्वीच जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे फटाके वाजणार आहेत, तसेच ८२ ग्रामपंचायतीच्या चार सरपंच व ११३ सदस्य पदाची देखील निवडणूक प्रक्रिया या सोबतच संपन्न होत आहेत

या निवडणुकीची नोटीस तहसीलदार प्रसिद्ध करणार असून ५ नोव्हेंबर रोजी मतदान तर ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार मतमोजणी प्रक्रियेतून निवडणुकीचा निकाल घोषित करणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील जानेवारी डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक तसेच रिक्तपदांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे.

ग्रामपंचायत सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी ही निवडणूक घोषित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के सूर्यकृष्णमूर्ती यांच्या सही शिक्क्यानुसार जाहीर झालेल्या या आदेशात या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नामनिर्देशन पत्र मागवण्याचा व सादर करण्याचा अवधी १६ ते २० ऑक्टोबर, २३ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी, २५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. २५ ऑक्टोबर रोजी चिन्ह वाटप होईल.

५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित तहसीलदार मतमोजणी प्रक्रिया करीत निकाल घोषित करणार आहे. या निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्याचा अंतिम दि. ९ नोव्हेंबर आहे.

सार्वत्रिक निवडणुकीच्या ग्रामपंचायती

अकोले- कोभाळणे, पैठण, जहागीरदारवाडी, बारी, साम्रद रतनवाडी, मुतखेल, शिसवद, पाचनई, अवत, पेंडशेत, वाजुळशेत रेडे, कवठवाडी, पिंपळगाव नाकविदा, आंबेवगन, देवगाव, एकदरे, कोकणवाडी, तिरडे, पाचपटवाडी, घोटी, पेढेवाडी, पिंपळदरावाडी, खानापूर आगार

संगमनेर- गुंजाळवाडी, आश्वी खुवं आश्वी बुद्रुक, बोरबन, घारगाव, पिंपळगाव कोझीरा.

कोपरगाव- कुंभारी, घोयेगाव, ग्रामणगाव, वारी, जवळके, धोत्रे, बोलका, सुरेगाव, लोको, मुतपुर, चांदगव्हाण, दहिगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहाजापूर, मंजूर, कान्हेगाव. राहता दहेगाव कोन्हा कोन्हाळे, निमगाव कोल्हाळे धनगरवाडी, दुर्गापुर, वाकडी बुद्रुक, पिंपरीनिर्मळ, कनकुरी, पुणतांबा, रस्तापूर, चितळी

श्रीरामपूर- उंदीरगाव, शिरसगाव, उक्कलगाव, निमगाव खैरी, भोकर, फल्याबाद, खिर्डी, कान्हेगाव, गुजरवाडी, माळवडगाव, दत्तनगर, भैरवनाथनगर, जाफराबाद, नाऊर, दिघी, रामपूर, कडीत बुद्रुक.

राहुरी- कानडगाव, चिंचोली, पिंपरी वळण, निभेरे, सडे, दिग्रस, शिलेगाव, दरडगाव थडी, मोमीन आखाडा, घोरपडवाडी, धामोरी बुद्रुक, धामोरी खुर्द, महेसगाव, देशवंडी, तमनराखाडा, गंगापूर, चारगाव नांदूर, ब्राह्मणी, माहेगाव, मालुंजे खुर्द, मुसळवाडी, टाकळीमिया नेवासा करजगाव, पानेगाव, देडगाव, पाचेगाव, फत्तेपूर, रस्तापूर, कवठा, शहापूर, पिचडगाव, भानसहिवरा, खुणेगाव, नागापूर, जैनपूर, सोपाळा, पानसवाडी, मुकिंदपूर.

जामखेड-मुंजेवाडी, मतेवाडी, जवव्य, कर्जत-कुंभेफळ, वायसेवाडी, खेड, गणेशवाडी, आवटेवाडी, करमनवाडी. श्रीगोंदा- विसापूर, अधोरेवाडी, पेडगाव, आनंदवाडी, कोळगाव, देवण, वडगाव, टाकळी लोणार, लोणी व्यंकनाथ, घुटेवाडी, पारनेर विरोली, यादववाडी, माळेवाडी, कावाडी, वाडेगव्हाण, कान्हूर पठार, जामगाव, निबोडी.

नगर – बारवरी, मेहेकरी, हिवरझरे, आरणगाव, देऊळगाव सिद्धी, हिंगणगाव, वडगाव गुप्ता. शेवगाव तालुक्यातीलही २७ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe