राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना जून २०२४ अखेर २ कोटी ४८ लाख ४ हजार ८०० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५२४० लाभार्थ्यांना ७७ लाख ७६ हजार ६०० रुपये, माहे जून चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती ५६२ लाभार्थ्यांना, ८ लाख ३५ हजार २०० रुपये, माहे एप्रिल मे आणि जून चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती २२६ लाभार्थ्यांना,

१९ लाख ८ हजार रुपये, माहे जून चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण ५३११ लाभार्थ्यांना ७९ लाख ६६ हजार ५०० रुपये, माहे जून चे श्रावणबाळ गट – ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती ६९५ लाभार्थ्यांना, १० लाख ४२ हजार ५०० रुपये,
माहे एप्रिल आणि मे चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२४ लाभार्थ्यांना, ९ लाख ७२ हजार रुपये, माहे जून चे श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना४०२८ लाभार्थ्यांना, ५२ लाख ४ हजार रुपये मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खातेवर काल शनिवारी वर्ग करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक लवकर घेणार असून कागदपत्रे परिपूर्ण असणाऱ्यांनी जमा करावी. तसेच ज्या महिला संजय गांधी निराधार मध्ये नियम, अटी पूर्ण करू न शकल्या नाही त्यांची प्रकरणे नामंजूर झालेली आहेत. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मध्ये लाभ घ्यावा.
ज्यांना संजय गांधी योजना लाभ मिळत आहे. त्यांनी लाडकी बहिण योजनासाठी फॉर्म भरू नये. संगमनेर तालुक्यात संजय गांधी निराधार योजना मेळावे गावागावात सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही एजंट यांना कागदपत्रे, पैसे देऊ नये.
महायुती सरकारतर्फे योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा संकल्प असून यासाठी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा. प्रकरणे नियमानुसारच मंजूर होणार असल्यामुळे फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.
तसेच लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास आपल्या संपर्क कार्यालयात अथवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन खताळ यांनी केले आहे.