अहिल्यानगर जिल्ह्यातील 2200 कुटुंबाची फायनान्स कंपनीकडून फसवणूक; दाखवले पीएम आवास योजनेच्या अडीच लाख रुपये अनुदानाचे आमिष

अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 2200 कुटुंबाची वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून या प्रधानमंत्री आवास योजनेच्या दोन लाख 67 हजार रुपयांचे अनुदानाचा लाभ देण्यात येईल अशा प्रकारचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आलेले आहे.

Ajay Patil
Published:
ahilyanagar news

Ahilyanagar News: सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत आणि अनुदानाचा लाभ दिला जातो.

परंतु केंद्र सरकारच्या या प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीत अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वेगळीच बातमी समोर आली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 2200 कुटुंबाची वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून या प्रधानमंत्री आवास योजनेच्या दोन लाख 67 हजार रुपयांचे अनुदानाचा लाभ देण्यात येईल अशा प्रकारचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आलेले आहे.

ज्यांनी या फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेले होते त्या कर्जाचे हप्ते परतफेड करता येत नसल्यामुळे कर्जदारांनी ठेवलेल्या जमीन तसेच घर जप्तीच्या नोटीस आता संबंधित फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना देण्यात आले आहेत.

त्यामुळे आता यावर मार्ग काढण्यासाठी सोमवारी कर्जदारांनी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या फायनान्स कंपन्यांकडून दिलेल्या जप्तीच्या नोटिसीला स्थगिती देण्याची विनंती केली आहे.

 प्रधानमंत्री आवास योजनेच्या अडीच लाखांच्या अनुदानाचे आमिष दाखवून फायनान्स कंपनीकडून फसवणूक

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेची २ लाख ६७ हजार रुपयांच्या अनुदानाचा (सबसिडी) लाभ देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून जिल्ह्यातील २२०० कुटुंबांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

कर्जदारांना कर्जाची परतफेड करता येत नसल्याने फायनान्स कंपन्यांकडून तारण ठेवलेली जमीन, घर जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी कर्जदारांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जप्तीला स्थगिती देण्याची विनंती केली. २०१६-१७ साली फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेतले होते.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेची २ लाख ६७ हजार रुपयांच्या अनुदानाचा (सबसिडी) लाभ देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून जिल्ह्यातील २२०० कुटुंबांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

२०१६-१७ साली फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेतले होते. त्यावेळी कर्ज घेताना प्रधानमंत्री आवास योजनेचे २ लाख ६७ हजार रुपयांचा लाभ मिळेल असे सांगितले. परंतु यातील काहींना सबसिडी मिळाली नाही. यानंतर त्यांनी कंपनीला विचारले असता, तुम्ही पात्र नसल्याचे सांगितले.

सरकारने रेपो रेट वाढवल्यानंतर कंपनीने कर्जदारांना माहिती न देताच परस्पर कर्जाचे वर्ष आणि हप्त्याची रक्कम वाढवली आहे, असे कर्जदारांचे म्हणणे आहे. मोतीलाल ओसवाल होम फायनान्स,इतर फायनान्स कंपन्या, खासगी बँक, सहकारी बँक यांच्याकडून फसवणूक झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

फायनान्स कंपनीने गृहकर्ज देताना १४ टक्के व्याजदराने पैसे दिले होते. रेपो रेट वाढल्यानंतर १५.५ टक्के व्याजदर लागू केला आहे. जिल्ह्यात विविध फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेले एकूण २२०० कुटुंब आहेत.

यातील १००० ते १२०० कुटुंबांन फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. कर्जदारांनी आतापर्यंत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकः कार्यालय, विभागीय आयुक्त तहसीलदार आदी ठिकाणी निवेदन दिले आहे. परंतु अद्याप कोणतीर्ह कार्यवाही झाली नाही, असे आंदोलकांनी सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe