अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमूळे शेतीपिकांसह, दुकाने, जनावरे, राहती घरे, रस्ते आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
यामध्ये नुकसान झालेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासन निधीतून शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या वाढीव दराप्रमाणे आवश्यक निधीपैकी नगर जिल्ह्याला २८ कोटी ३३ लाख ६८ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.
यात जिल्ह्यात सर्वाधिक निधी शेवगाव तालुक्यासाठी तर त्याखालोखाल पाथर्डी तालुक्याला नुकसान भरपाई निधी प्राप्त झाला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून त्या- त्या तालुक्यास हे अनुदान प्राप्त झाले असून, पूरग्रस्त गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी वितरित करण्यासाठी याद्या तयार केल्या जात आहेत.
यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील नगर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीरामपूर व कोपरगाव आदी सहा तालुक्यातील २५८ गावांतील ७६ हजार ५९३ बाधित शेतकऱ्यांना २८ कोटी ३३ लाख ६८ हजार रुपये निधी वाटप करण्यात येणार आहे.
या सहा तालुक्यासाठी प्रशासनाने राज्य शासनाकडे ४५ कोटी ३४ लाख १० हजार ७९ रूपये निधीची मागणी केली होती. यापैकी २८ कोटी ३३ लाख ६८ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.
तालुकानिहाय प्राप्त निधी..
तालुका गावे शेतकरी निधी :-
● नगर १० २१८ ६ लाख ७७ हजार
● पाथर्डी ११४ २५ हजार ९२३ ६ कोटी ९६ लाख ३ हजार
● शेवगाव ७९ ३९ हजार ५०९ १६ कोटी ३५ लाख हजार
● जामखेड ०३ २३३ १२ लाख ३७ हजार
● श्रीरामपूर १६ ४ हजार ७३२ १ कोटी ७३ लाख ६८ हजार
● कोपरगाव ३६ ५ हजार ९७९ ३ कोटी ९ लाख ४३ हजार
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम