अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जगभरातील 30 देशांमध्ये Omicron चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गक्षमता जास्त असल्याचं दिसतंय, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
हे सर्व संशयित मुंबई, पुणे, ठाणे ह्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शहरांमध्ये आहेत. तशीच ही तीनही शहरं गर्दीची आहेत. संशयितांपैकी एकट्या मुंबईत 10 जण आहेत तर इतर 18 जण हे विविध शहरांतील आहेत.
दरम्यान पुणे व मुंबई ह्या दोन्ही शहरातलगत असल्याने नगरकरानीही सावध राहणे गरजेचे बनले आहे, तूर्तास अहमदनगर जिल्ह्याला तरी ओमिक्रॉनचा धोका नाहीय, तसेच अहमदनगर जिल्ह्यात आढळणारी दैनदिन रुग्णसंख्याही कमी होते आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अवघे ४० रुग्ण आढळले आहेत यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या सध्यातरी आटोक्यात आलेली दिसून येत आहे.
अकोले, नगर ग्रामीण , पाथर्डी या तिन्ही तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नाहीय.
आज अहमदनगर जिल्ह्यात पुढीलप्रमाणे रुग्ण आढळले आहेत
अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोव्हिड अनुषंगिक वर्तन आपण अंगी बाळगावे, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी उपयुक्त आहेत, अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
आफ्रिकेतल्या सर्वच प्रांतात ओमिक्रॉनचे रुग्ण
कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉननं आफ्रिका तसच यूरोपात दहशत निर्माण केलीय. त्यातही दक्षिण आफ्रिकेतल्या जवळपास सर्वच प्रांतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडतायत. हा आकडा आता सध्या तीन हजाराच्या पुढे आहे आणि ह्या आठवड्याच्या शेवटी तो 10 हजारापर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
बोत्सवाना, झिम्बाब्वे, मोझंबिक अशा इतर आफ्रिकन देशातही ओमिक्रॉननं चांगलेच हातपाय पसरलेत. युरोपात जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडमध्येही कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्यानं वाढतेय.
भारतात 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित
त्यामुळेच ह्या सर्व देशातून येणाऱ्या प्रवाशांवर वॉच ठेवला जातोय. अमेरीकेतही पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी त्यांच्या सीमाही बंद केल्या. भारतानेही 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित करण्याची घोषणा केलीय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम