एमपीएससी परीक्षेला ३ हजार २८९ उमेदवारांची दांडी!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Ahmednagar News :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी मार्फत रविवारी गट क सेवा पदासाठी एका सत्रात संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेस अहमदनगर मधील ४१ केंद्रामध्ये १३ हजार ९६९ उमेदवारांपैकी १० हजार ६८० उमेदवार हजर राहिले. या परीक्षेला ३ हजार २८९ उमेदवार गैरहजर राहिले.

परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार या परीक्षेचे काटेकोर नियोजन अहमदनगर शहरातील ४१ उपकेंद्रांवर करण्यात आले होते.

परीक्षेसाठी समन्वय,भरारी पथक अधिकारी,उपकेंद्रप्रमुख, सहायक,पर्यवेक्षक,समवेक्षक,लिपीक,केअर टेकर,वाहनचालक असे जवळपास तब्बल १ हजार २१३ अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

सहायक केंद्र प्रमुख म्हणून महसूल शाखेच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांच्याकडे जबाबदारी होती. परीक्षा केंद्र परीसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe