अहिल्यानगरच्या ‘या’ काॅलेजमधील ४४ अभियंत्यांना जपानी कंपनीत मिळाले तब्बल १७ लाखांचं पॅकेज

Updated on -

कोपरगाव- संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ४४ विद्यार्थ्यांनी एक मोठं यश मिळवलं आहे. एका नामांकित जपानी कंपनीने या अभियंत्यांची निवड केली आणि त्यांना तब्बल १७ लाखांहून अधिक वार्षिक पॅकेजची नोकरी दिली. कॉलेजने या कंपनीशी केलेल्या सामंजस्य कराराचा हा परिणाम आहे. विशेष म्हणजे, संजीवनीतच जापनीज भाषेचं प्रशिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांना ही संधी सहज मिळाली.

या यशामागे कॉलेजच्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल (आयआयआयसी) आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टीअँडपी) विभागाची मेहनत आहे. या दोन्ही विभागांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना तयार केलं आणि त्यांना हे यश मिळवून दिलं.

ग्रामीण भागात असूनही संजीवनी कॉलेजने अनेकदा आपल्या खास उपक्रमांमुळे ग्रामीण भागातून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. या ४४ अभियंत्यांना जपानी कंपनीत नोकरी मिळाल्याने कॉलेजचा हा प्रवास आणखी दृढ झाला आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये क्रिष्णराज बडदे, गायत्री गवळी, कल्याणी घोडके, सानिका कदम, कार्तिक काळे, पार्थ गुंजाळ, संकेत पठारे, गायत्री सांगळे, शर्वय सुराळकर, विराजी शेलार, वैष्णवी शिंदे, आदित्य शिनगर, श्रुतिका ऊल्हारे, दिपाली झगडे, आशिष काळे,

किरण साबळे, किशोर भांगरे, आर्यन आगवन, गायत्री भालेराव, अश्विनी सालके, सानिका अम्बोरे, वैष्णवी माणे, अश्विनी माणे, शिवप्रसाद माणे, साक्षी सोनवणे, ऋतुजा सूर्यवंशी, वैष्णवी आग्रे, साक्षी भगत यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी आपल्या मेहनतीने आणि कॉलेजच्या पाठबळाने हे यश संपादन केलं.

या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व नवोदित अभियंत्यांचं, त्यांच्या पालकांचं आणि कॉलेजच्या टीमचं कौतुक केलं.  त्यांनी व्हाइस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर, डायरेक्टर डॉ. एम. व्ही. नागरहल्ली, डिन डॉ. विशाल तिडके आणि प्रा. अतुल मोकळ यांचंही अभिनंदन केलं. जापनीज भाषेच्या प्रशिक्षणासारख्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे हे यश मिळालं, याचा त्यांना विशेष अभिमान आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe