अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- नेवासा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ सुरुच असून काल शनिवारी 51 हजार 740 गोण्या ( 28 हजार 457 क्विंटल) आवक झाली.
भाव जास्तीत जास्त 3400 रुपयांपर्यंत स्थिर होते. एक़-दोन लॉटला 3300 ते 3400 रुपये भाव मिळाला. मोठा कलर पत्ती कांद्याला 2800 ते 3200 रुपये भाव मिळाला.
मिडीयम सुपर कांद्याला 2100 ते 2600 रुपये, गोल्टा कांद्याला 1700 ते 2000 रुपये, गोल्टी कांद्याला 1500 ते 1700 रुपये, जोड कांद्याला 500 ते 600 रुपये, तर सरासरी भाव 2000 ते 2300 रुपये इतका निघाला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम