अमृतवाहिनी आयटीआयच्या 68 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच नोकऱ्या

Published on -

माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्थेने गुणवत्तेने देशात आपला लौकिक निर्माण केला असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर असलेल्या समन्वयामुळे अमृतवाहिनी आयटीआय मधील 68 विद्यार्थ्यांची निकालापूर्वी चांगल्या पगारावर नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य भाटे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा आ डॉ. सुधीर तांबे व संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआय ने सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. टेक्निकल प्रदर्शनासह विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये राज्य पातळीवर प्राविण्य मिळवले आहे.

ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध कंपन्यांबरोबर समन्वय करण्यात आला असून ज्या कंपन्यांच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन केले जाते. यामध्ये नुकतेच पुणे येथील महिंद्रा ऑटो स्टील, पार्कसन पॅकेजिंग लिमिटेड, डायना के ऑटो स्टॅम्पिंग भोसरी, मॅक लोडस फार्मासिटिकल लिमिटेड दमन या कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू झाले आहेत यामधून फिटर इलेक्ट्रिशियन वायरमन या ट्रेडच्या 68 विद्यार्थ्यांची चांगल्या पगारावर थेट नोकरीसाठी निवड झाली आहे. अंतिम परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. साठी ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे बी गुरव, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी धुमाळ, प्राचार्य विलास भाटे यांनी अभिनंदन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe