Small Business Idea : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी कंपनी टाटा समूह आपल्या तीन हजार कर्मचाऱ्यांना नारळ देऊ शकते अशा आशयाचे वृत्त व्हायरल झाले होते. याबाबत अजून अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही मात्र हे वृत्त समोर येण्यापूर्वी अमेझॉन, फेसबुक, गुगल यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहे. यामुळे टाटा देखील आपल्या कर्मचाऱ्यांना काढू शकते यात काही वेगळेपण नाही. पण यावरून खाजगी क्षेत्रातील असुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेस आली आहे.
खाजगी क्षेत्रात नोकरीमध्ये सुरक्षितता राहिलेली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून विशेषता कोरोना काळापासून आता तरुण वर्ग नोकरी ऐवजी व्यवसायाला विशेष महत्त्व देत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक तरुणांनी व्यवसायात हात आजमावला आहे. विशेष म्हणजे यापैकी काही तरुण व्यवसायात यशस्वी देखील झाले आहेत.
दरम्यान जर तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल आणि अगदी कमी भांडवलात तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण अवघ्या 70 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येणाऱ्यां बिजनेस बाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणता आहे तो व्यवसाय?
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे टी-शर्ट प्रिंटिंगचा. अलीकडे बाजारात कस्टमाईज टी-शर्टची मोठी डिमांड आली आहे. साधे टी-शर्ट वापरण्याऐवजी अनेकजण कस्टमाईज टी-शर्ट वापरण्याला पसंती दाखवत आहेत. बाजारात कस्टमाईज टी-शर्टला मोठी मागणी असल्याने टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय अलीकडे डिमांड मध्ये आला आहे. यामुळे हा व्यवसाय सुरू करून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकणार आहात.
हा व्यवसाय फक्त आणि फक्त 70 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो आणि यातून महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. टी-शर्ट प्रिंटिंगसाठी प्रिंटर, हीट प्रेस, संगणक, कागद आणि कच्चा माल म्हणून टी-शर्ट लागतात. जर तुम्ही छोट्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला जास्त भांडवल लागणार नाही.
मात्र तुम्हाला जर मोठ्या प्रमाणावर काम करायचे असेल तर 2 लाख ते 5 लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत. टी-शर्ट प्रिंटिंगच्या व्यवसायासाठी तुम्हाला मशीन खरेदी करावे लागणार आहे. स्वस्त मशीन खरेदी करत असाल तर ते मॅन्युअल राहणार आहे. या मशीनच्या माध्यमातून एका मिनिटात एक टी-शर्ट प्रिंट होऊ शकणार आहे.
किती कमाई होणार?
या व्यवसायासाठी एक साधारण मशीन पन्नास हजाराचे येते. तुम्ही हे 50 हजाराचे मशीन आणून हा व्यवसाय सुरू करू शकता. मशीन आणल्यानंतर तुम्हाला कच्चे मटेरियल म्हणून व्हाईट टी-शर्ट खरेदी करावे लागतील. याची किंमत जवळपास 120 रुपयांपर्यंत जाऊ शकते. तसेच तुम्हाला प्रिंटिंग साठी दहा रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागणार आहे.
जर तुम्हाला प्रिंटिंगचा दर्जा चांगला ठेवायचा असेल तर प्रिंटिंग साठी 20 ते 30 रुपये खर्च करावा लागू शकतो. तसेच प्रिंटिंग झालेला हा शर्ट तुम्ही बाजारात दोनशे ते तीनशे रुपयांना विकू शकता. जर तुम्ही थेट कस्टमरला विक्री केली तर तुम्हाला नफा अधिक राहणार आहे. मात्र जर तुम्ही तुमचा माल होलसेल मध्ये दुकानदारांना पुरवणार असाल तर यामध्ये तुमचा मार्जिन कमी होऊ शकतो.