Ahmednagar News : नगर-पाथर्डी- राहुरी मतदारसंघातील विविध गावांमध्ये पर्यटन विकास योजनेंतर्गत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचा निधी तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली.
माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकारातून मतदारसंघात पर्यटन विकासासाठी चार कोटी तर जलसंधारण साठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत.
याध्ये राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील संत महिपती देवस्थान, नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गड देवस्थान, चिचोंडी पाटील येथील हनुमान मंदिर परिसरात विविध सोयी सुवधा निर्माण करण्यात येणार आहेत.
पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील वृद्धेश्वर देवस्थान, लोहसर येथील भैरवनाथ देवस्थान, शिराळ येथील दुर्गा देवी देवस्थान परिसरातील विकासाकामासाठी निधी मंजूर करण्यात आला असून,
लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती कर्डिले यांनी दिली. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून नगर मंजूर झालेल्या तालुक्यात पाच कोटी रुपयांच्या निधीतून पिंपळगाव माळवी व पिंपळगाव लांडगा येथे बंधाऱ्यांची कामे करण्यात येणार आहेत.
ना. गिरीश महाजन व ना. संजय राठोड यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्डिले यांनी त्यांचे आभार मानले आहेत.