जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  वीजबिल वसुलीसाठी महावितरणकडून विविध योजना राबवण्यात येत आहे. याचा फायदा देखील महावितरणला होत असल्याचे दिसून येत आहे.

थकीत वीजबिल वसुली होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणला आधार मिळतो आहे. नुकतेच कृषीपंपाच्या वीज बिलातील थकबाकी भरण्यासाठी सरकारने महाकृषी ऊर्जा अभियान सुरू केले आहे.

याचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना झाला आहे. या योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील या शेतकर्‍यांकडे 38 कोटी 24 लाख रूपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी 5 कोटी 82 लाख रूपये चालू वीजबिल व 50 टक्के थकबाकीचे 19 कोटी 12 लाखांचा भरणा केला.

यात उर्वरित 50 टक्के थकबाकीचे 19 कोटी 12 लाख रूपये माफ करण्यात आले आहेत. कृषिपंपाच्या वीज बिलातील थकबाकीत सुमारे 66 टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे.

यात जिल्ह्यातील जवळपास 4 लाख शेतकर्‍यांच्या मूळ थकबाकीमधील 1 हजार 649 कोटी 83 लाख रूपये माफ करण्यात आले आहेत.

तर या शेतकर्‍यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा येत्या मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास आणखी 1 हजार 689 कोटी 21 लाख रूपयांची माफी मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News