अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- शेतात काम करणारा एक सोळा 16 वर्षांचा युवक मोटार चालू करायला गेला असता त्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात घडली आहे.
दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, विशाल संतोष बोरावके (वय 19 वर्ष) रा. जेऊर पाटोदा हा आपल्या शेतातील विहीरीवरील पाण्याची मोटार चालू करायला गेला

असता त्याला विजेचा जोराचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सरपंच सतीश केकान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला. मयत विशाल याच्या पश्चात आईवडील, एक 10 वर्षाचा भाऊ असून विशाल हा कोपरगाव शहरातील एसजी विद्यालयात इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकत होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम