अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. कारण जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे.
दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक दहशतीखाली वावरू लागले आहे. तर चोरटे मात्र निर्धास्त आहे. यामुळे चोरट्यांवर अंकुश लावण्यात पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरते असल्याचे दिसून येत आहे. यातच नगर शहरात दिवसाढवळ्या एक चोरीची घटना घडली आहे.

नगर शहरातील अतिशय गजबजलेल्या नवीपेठेतून भरदुपारी व्यापार्याची 1 लाख रुपयाची रोकड असलेली बॅग 2 मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात 4 चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत दिनेश प्रकाश थवानी (रा.सिंधी सोसायटी, बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी थवानी यांचे फर्निचरचे दुकान असून ते नवीपेठेत असलेल्या आधुनिक कुरइर कार्यालयात गेले होते.
त्यावेळी त्यांच्या ऍव्हिएटर या मोपेडच्या डिक्कीत (क्र.एम.एच.16, बी.डी.1115) ठेवलेली 1 लाख रुपयांची रोकड 2 मोटारसायकलींवर आलेल्या अज्ञात 4 चोरट्यांनी चोरुन नेली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम