Ahmednagar Crime : सोनई येथील दिशा किरण गोसावी (वय २३) या महिलेचा सासरच्या लोकांनी सन २०१९ पासून मानसिक छळ करून नवीन दुकान बांधण्यासाठी माहेरून १० लाख रुपये घेऊन येण्यास सांगत छळास कंटाळून (दि. २४) आत्महत्या केली आहे.
याबाबत संजय निवृत्ती गोसावी (रा. वेळापूर, ता. कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती किरण रवींद्र गोसावी, सासरे रवींद्र मच्छिद्र गोसावी, सासू आशाबाई रवींद्र गोसावी,
नणंद प्रियंका अभिजीत गोसावी, दिर गणेश रवींद्र गोसावी (सर्व रा. सोनई) यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे करीत आहे.