अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. गायकवाड यांच्या घरी पोस्टाने हे पत्र आले असून त्यात त्यांना आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीचा मजकूर आहे.(Ahmednagar Crime)
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी आ. संग्राम जगताप, अशोक गायकवाड हे सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते.
अधीक्षक पाटील बाहेरगावी असल्याने त्यांची भेट होवू शकली नाही. गायकवाड हे सावेडी उपनगरातील बिशप लॉईड कॉलनीमध्ये राहतात.
गायकवाड यांना 25 डिसेंबरच्या आतमध्ये बिशप लॉईड कॉलनी सोडून जाण्याचे या पत्रातून सांगितले आहे. नाही तर त्यांच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याचे धमकी देण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम