वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिविगाळ : भाजप तालुका उपाध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News:न विचारता वीज बंद केल्याच्या कारणातून नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांना दोघांनी शिवीगाळ करत धमकी दिली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्याम भास्कर भांड यांनी फिर्याद दिली आहे. नाथकृपा इंडस्ट्रीजचे मालक विजय संपत दरकुंडे व राजेंद्र पाराजी दारकुंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राजेंद्र दारकुंडे हे भाजपचे तालुका उपाध्यक्ष आहेत. फिर्यादी व त्यांचे सहकारी सबस्टेशनमध्ये ड्युटीवर असताना विजय व राजेंद्र दारकुंडे तेथे आले.

ते फिर्यादीला म्हणाले,‘तु मला न विचारता, मला फोन न करता, अचानकपणे लाईट बंद का केली, मला कोणतीही पूर्व कल्पना का दिली नाही’,

असे म्हणून शिवीगाळ केली. ‘तु पुन्हा मला न फोन करता लाईट बंद केली तर तुमच्याकडे पाहुन घेतो’, अशी धमकी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe