Ahmednagar News : मारहाण केल्याप्रकरणी येथील सोनई पोलीस ठाण्यात नुकताच पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच परिसरातील एका युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिमोन विकास भालेराव (वय २२) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, घरासमोर बसलेलो असताना गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून आमच्या मुलीच्या अंगावर का भुंकला, असे म्हणून हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांड्याने मारहाण करून धमकी दिली.

Ahmednagar News
या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात पप्पू भास्कर वैरागर, पिंटू वैरागर, भोऱ्या वैरागर, सुयोभ वैरागर, संदेश वैरागर (सर्व रा. अंबिकानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मारहाण घटनेचा तपास पोलीस नाईक बी.जी. बाचकर करीत आहेत.