इन्शुरन्ससाठी बनावट दस्तावेज तयार करणाऱ्या भामट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- ट्रकच्या इन्शुरन्स पॉलिसीची बनावट दस्तावेज तयार करून पॉलिसी करीता रक्कम घेतल्याप्रकरणी खरवंडी येथील रणजीत मच्छिंद्र कुर्‍हे याच्यावर शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

याबाबत अधिक माहिती अशी, जयेश रामलाल कर्डिले (वय 22) धंदा- ट्रान्सपोर्ट रा. सांगवी म्हाळसपिंपळगाव ता. नेवासा यांनी 16 डिसेंबर 20 रोजी विमा सेवा केंद्र वडाळा बहिरोबा ता नेवासा येथे ट्रक या वाहनाची एक वर्षाकरिता इन्शुरन्स पॉलिसी काढली.

या पॉलिसीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवून 54 हजार 723 रुपये भरून घेतले. जयेश कर्डिले यांनी कागदपत्रांची शहानिशा करण्याकरता विचारले असता

रणजीत कुर्‍हे याने शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी रणजीत मच्छिंद्र कुर्‍हे रा. खरवंडी ता. नेवासा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!