Ahmednagar News : जिल्ह्यात ग्रामसेवकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या असून सदरचा गुन्हा मागे घेतल्याशिवाय काम न करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील ग्रामविकास अधिकारी नारायण घेरडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. चापडगाव ग्रामपंचायत बाजार तळावर इलेक्ट्रिक पोलवर फ्लेक्स बोर्ड झाकलेला नव्हता
याबाबत ग्रामस्थांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी हा गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा दाखल होताच ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
याबाबत स्थानिक संघटना आणि जिल्हा संघटना पदाधिकारी तालुका प्रशासनाबरोबर संघर्ष करीत आहेत गुन्हा मागे झाल्याशिवाय कामकाज करणार नाहीत अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश त्यांना जिल्हा संघटनेने दिलेले आहेत.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरकर यांच्याबरोबर चर्चा झालेली आह. त्यांनी सुद्धा सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलतो अशी चर्चा झाली आहे. असे ग्रामसेवक संघटनेचे नेते एकनाथ ढाकणे यांनी सांगितले.