अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- गणेश सहकारी साखर कारखान्याने दिपावली सणानिमित्त ऊस उत्पादक सभासद शेतकर्यांना तातडीने उसाचे पेमेंट करावे अशी मागणी शेतकरी नेते बाळासाहेब चव्हाण यांनी केली आहे.
पेमेंट करावे म्हणून म्हणून पुणतांबा परिसरातील शेतकर्यांचे शिष्टमंडळ दोन दिवसात कारखान्याच्या पदाधिकार्यांना भेटून साकडे घालणार आहेत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान मागील गळित हंगामात गणेश सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन 2219 पेमेंट केले, त्यानंतर पेमेंट केले नाही. जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी प्रतिटन 2500 रुपयापर्यंत पेमेंट केलेले आहे.
गणेश सहकारी साखर कारखाना सुरु राहावा म्हणून सभासदांनी इतर कारखान्याला ऊस न देता गणेशला आपला ऊस दिला.
दरम्यान अवघ्या एक दिवसावर दिपावलीचा सण आला असून दिवाळी निमित्त कारखाना पेमेंट करील म्हणून आशा बाळगून आहे.
मात्र अद्यापही पेमेंट बाबत कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे परिसरातील सभासदामध्ये खूपच नाराजी निर्माण झाली आहे. या प्रश्राबाबत कारखान्याचे पदाधिकारी तसेच संचालक काहीही बोलण्यास तयार नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम