तलाठी पथकाच्या ताब्यातून पळविला मुरुमांचा डंपर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- नगर-दौंड रोडवरील कायनेटीक चौकात अवैधरित्या मुरूमाची वाहतूक करणारा डंपर तलाठी पथकाच्या ताब्यातून पळविण्यात आला असल्याची घटना घडली आहे.

सावेडीचे कामगार तलाठी सागर एकनाथ भापकर (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे. दाखल फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात डंपर चालक अजिनाथ साळवे व तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अवैधरित्या मुरूमाची वाहतूक केली जात असल्याची माहिती तलाठी भापकर यांना मिळाली होती. ते पथकासह कारवाईसाठी गेले.

त्यावेळी त्यांनी साडेतीन ब्रास मुरूम असलेला डंपर ताब्यात घेतला. त्याचा पंचनामा केला. तो डंपर नगर तहसील कार्यालयाकडे घेऊन जात असताना कारमधून तीन अनोळखी इसम आले.

त्यांनी कायनेटीक चौकात डंपरला कार आडवी लावून तलाठी पथकाला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

तलाठी भापकर यांच्या ताब्याती कारवाईचे कागदपत्रे हिसकावून घेतले व डंपर पळवून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe