नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची नामांकित कंपनीकडून फसवणूक ; मर्यादेपेक्षाही जास्त दिली ‘ती’ रोपे

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सध्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत कठीण आहे. कारण दुधास भाव नाही, शेतात पिकवलेल्या शेतमालास भाव दिला जात नाही. मात्र दुसरीकडे पशुखाद्यांचे दर, बियाणे, रासायनिक खाते इतर वस्तूंचे भाव भरमसाठ वाढले आहेत.

त्यामुळे शेतकरी उत्पादन घेण्यासाठी जेवढा खर्च करतो तेवढे पैसे त्याला त्याने पिकवल्या शेतमाल विक्री करून मिळतीलच याचा भरोसा नसतो. त्यातच अनेकदा महागडे बियाणे चांगले उगवत नाही. खतात देखील अन्य घटक मिसळले जातात. अशा प्रकारे सर्व बाजूने शेतकऱ्यांची कोंडी केली जाते.

आता पारंपरिक शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. यात फळबाग लागवड, फुल शेती आदींसह विविध प्रकारे शेती करतात. मात्र अशा शेतकऱ्यांना देखील फसवल्याचा प्रकार समोर आला आहे.

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची जळगांव येथील एका नामांकित कंपनीने चुकीचे रोपे देऊन फसवणूक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील शेतकरी भारत आरगडे यांनी त्यांच्या शेतात पारंपरिक शेतीबरोबर फळबाग शेतीच्या उद्देशाने पपई या पिकाला पसंती देऊन जळगांव येथील एका नामांकित कंपनीकडून एक एकर क्षेत्रासाठी लागणारी पपईची रोपे खरेदी केली.

आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने लागवड करून बाग चांगल्या पद्धतीने उभी केली. मात्र या बागेमध्ये तीस टक्क्यांपेक्षाही जास्त पपईमध्ये नर जातीचे झाडे निवडल्यामुळे आर्थिक नुकसान होणार आहे.

या निराशेपोटी त्यांनी तालुका कृषी अधिकारी प्रताप कोपनर नेवासा पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी हिरवे यांच्याशी संपर्क करून लेखी तक्रार दिली. त्यानुसार श्रीरामपूर विभागीय कृषी अधिकारी काळे व त्यांचे सर्व सहकारी आणि राहरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी प्रत्यक्ष क्षेत्रास भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.

याबाबत शेतकरी आरगडे यांनी कंपनीच्या संबंधित विभागाकडे ऑनलाइन तक्रार केलेली होती. मात्र कंपनीने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. बियाणे नियंत्रण कायदा कायदानुसार बिल देणे बंधनकारक असताना विनंती करूनही बिल दिलेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe