दीड वर्षात ग्रामीण रस्त्यांसाठी २५० कोटींचा निधी मतदार संघात !

Maharashtra News

Ahmednagar News : मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात सरकार नसल्याने नुसत्या घोषणा केल्या गेल्या; परंतु निधी मिळत नव्हता. राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यामुळे दीड वर्षात ग्रामीण रस्त्यांसाठी २५० कोटींचा निधी मतदार संघात आला आहे.

आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्यात ७० कि.मी रस्ते मंजूर झाले असून, तीन राज्यमार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

शेवगाव तालुक्यातील काल (दि.४) रोजी अनेक गावांत आ. राजळे यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले, या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी चितळी ते बऱ्हाणपुर, हिंगणगाव ते अडबंगीनाथ, ढोरजळगाव ते भातकुडगाव, जवखेडे ते कासार पिंपळगाव, भातकुडगाव नजनवस्ती ते भायगाव, सामनगाव मळेगाव मिरी रस्ता दुरुस्ती, आव्हाणे यु. ते मळेगाव, कासार पिंपळगाव ते जवखेडे, अमरापुर चौधरी वस्ती, पागोरी पिंपळगाव, या २१ कोटी ८३ लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आ. राजळे यांच्या हस्ते झाले.

आ. राजळे म्हणाल्या, राज्यात शिंदे, फडणवीस, पवार सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मतदारसंघात ७० कि.मी. रस्ते या योजनेतून आले आहेत. ग्रामीण रस्त्यांचा विचार करता दीड वर्षात जवळपास अडीचसे कोटी रुपयांचा निधी आला आहे.

जलजीवन योजनेचे काम पूर्ण झाले असून, बचतगटांसाठी ४० कोटींचा निधी देण्यात आला आहे. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणूक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे आमचीही काही अपेक्षा असते. लोकप्रतिनिधींचे काय काम आहे, हे आम्हाला मांडावे लागते.

निवडणूक असो किंवा नसो आपण संघटनेचे काम करत असतो. संघटनेच्या बळावर निवडणूक करतो. मतदारसंघात जास्तीत जास्त मतदारांनी नमो अॅपशी संलग्न व्हावे. अगामी लोकसभा निवडणुकीत गावागावांतील मतदारांनी भाजपा युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाव, असे आवाहन आ. राजळे यांनी या वेळी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe