मुळा कालवा नूतनीकरण व नवीन वीज उपकेंद्राची मंजूर कामे सरकारने थांबवली; त्यांच्या सोयीचे राजकीय भूमिका घेत नसल्याने निधीला अडसर- आ.गडाख यांचा आरोप

च्या म्हणजे सरकारच्या सोयीची राजकीय भूमिका घेत नाही व त्यामुळेच तालुक्यातील विकास निधीला सरकारच्या माध्यमातून अडसर आणून माझी राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे.

Ajay Patil
Published:
shankarrao gadaakh

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी येथे गुरुवारी सकाळी हनुमान मंदिर व काशी विश्वेश्वर देवस्थान सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडला व या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग हे होते. या कार्यक्रमानिमित्त  आमदार शंकरराव गडाख हे देखील उपस्थित होते व या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, मी त्यांच्या म्हणजे सरकारच्या सोयीची राजकीय भूमिका घेत नाही व त्यामुळेच तालुक्यातील विकास निधीला सरकारच्या माध्यमातून अडसर आणून माझी राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे.

परंतु कितीही अडथळे आणले तरी मी माझे कौशल्य वापरून निधी मिळवल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली असून त्याकरिता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्याचे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी याप्रसंगी केले. इतकेच नाही तर मुळा कालवा नूतनीकरण व नवीन वीज उपकेंद्राची मंजूर कामे या सरकारने थांबवली असा आरोप देखील त्यांनी केला.

त्यांच्या सोयीचे राजकीय भूमिका घेत नसल्याने निधीला अडसर- आ.गडाख यांचा आरोप

त्यांच्या सोयीची राजकीय भूमिका घेत नसल्याने विकास निधीला अडसर आणून माझी राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी माझे कौशल्य वापरून निधी मिळवला असून केंद्र सरकारला घडा शिकवण्यासाठी – राज्यात महाविकास आघाडी सत्ता हवी आहे, असे आवाहन आमदार गडाख यांनी केले.

मुळा नूतनीकरण व नवीन वीज उपकेंद्राची मंजूर कामे या सरकारने थांबवली, असा आरोपही त्यांनी केला.तरवडी येथे गुरुवारी सकाळी हनुमान मंदिर व काशीविशवेश्वर देवस्थान सभामंडपाचे लोकार्पण आमदार गडाख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते.

प्रारंभी माजी बाबा घुले, बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली. आमदार गडाख म्हणाले, मुळा उजवा कालवा नूतनीकरणासाठी ७५ कोटींचा प्रस्ताव, तालुक्यात नवीन सहा वीज उपकेंद्र व जुन्यांची क्षमता वाढवणे अशी मंजूर कामे या सरकारने राजकीय द्वेशापायी थांबवली. अशी परिस्थिती कायम राहत नसते.

आघाडीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवेन,अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुक्यात मला निधी देण्याऐवजी तो इतरांना दिला असला तरी तो जनतेची अडचणी बघण्यापेक्षा त्यांच्या सोयीने खर्च केल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार अभंग यांनी राज्यात भाऊबंदकी व घरफोडीचे राजकारण सुरू असल्याबद्धल खंत व्यक्त केली. अध्यात्माचे अनुष्ठान नसेल, तर जीवन व्यर्थ असल्याचे सांगितले. यशवंत पाटील यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe