अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- पैठण येथील जायकवाडी धरणाच्या नाथसागरात अनेकदा मगरीचे दर्शन होत होते. मात्र या जलसाठ्यात मगर मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दरम्यान वन्यजीव विभागाच्या वतीने मगरीचा देह पाण्या बाहेर काढून कार्यालयात हलविण्यात आला. शवविच्छेदना नंतर नमुने पुणे व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

मगर कशामुळे मरण पावली असावी याचा अद्याप खुलासा झाला नाही आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या कर्हेटाकळी परिसरातील बँकवाटर क्षेत्रात पाण्याच्या कडेला सात फूट लांबीची मगर परिसरातील नागरिकांना आढळून आल्याने त्यांची धावपळ उडाली.
मात्र मगर कुठलीही हालचाल करत नसल्याने मगर मरण पावली असल्याचे लक्षात आले. या बाबत वन्यजीव विभागास माहिती देण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मगरीची पाहणी केली.तसेच स्थानिक नागरिक व वन्यजीव विभागाच्या कर्मचार्यांनी मगरीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
काढून तो पैठण येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात हलवीला आहे.
दरम्यान पैठण येथील पशुचिकित्सालय रूग्णालयात मगरीचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी औरंगाबाद व पुण्याला बुधवारी पाठवण्यात आहे. मगरीच्या मृत्यू कशामुळे झाला हे अहवालानंतर स्पष्ट होईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम