बिबट्याला चिरडलं अन् वाहन निघून गेलं ; अपघाताने पुन्हा चर्चेत आला कोपरगाव-येवला रोड

Published on -

कोपरगाव (जि. अहिल्यानगर): कोपरगाव-येवला रस्त्यावरील खिर्डी गणेश शिवारात गुरुवारी, २० मार्च २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.

तीन दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्या दिसून आला होता. घटनेच्या वेळी बिबट्या भास्कर वस्तीजवळ रस्ता ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. धडकेनंतर बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे, वनरक्षक श्रद्धा पडवळ आणि अमोल किनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन मजूर प्रदीप इंदरखे आणि सागर इंदरखे यांनी घटनास्थळ गाठले. तिथे पोहोचून त्यांनी पंचनामा केला आणि मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. वन विभागाने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News