अल्पवयीन मुलीला दारू पाजली अत्याचार केला आणि डोक्यात दगड टाकून खून

Published on -

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलीचा खून करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील उपनगरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तुषार विठ्ठल वाळुंज (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) याने मंगळवारी (दि. १९) रोजी घाटात नेले होते. यानंतर आरोपीने सदर मुलीस दारू पाजली.

स्वतःही मद्य प्राशन करून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर या तुषार याने डोक्यात दगड टाकून तिला ठार केले. सहा दिवसांनी हा प्रकार समोर आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत सूक्ष्म पद्धतीने तपास करुन तुषार विठ्ठल वाळुंज यास अटक केली आहे. त्याने गुन्हाची कबुली दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe