एक चूक जीवावर बेतली ! कॉलेज तरुणाचा रंगपंचमीच्या दिवशी दुर्दैवी अंत

Published on -

रंगपंचमी साजरी करण्यासाठी मित्रांसह शेततळ्यात गेलेल्या दंतवैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सुभाषनगर येथील डॉ. सचिन मजती यांच्या फार्महाऊसवर घडली. क्षितीजकुमार कुंडलिक क्षीरसागर (२२, रा. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

क्षितीजकुमार भारती दंत महाविद्यालयात अखेरच्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी रंगपंचमीनिमित्त तो आणि त्याचे पाच ते सहा मित्र मिरजेतील दंतरोगतज्ज्ञ डॉ. मजती यांच्या फार्महाऊसवर गेले होते.

दुपारी तीन वाजता ते सर्वजण शेततळ्यात पोहायला उतरले. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने क्षितीजकुमार अचानक बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe