Sujay Vikhe Patil : लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कान्हूर पठार गणासह संपूर्ण तालुक्यात सातत्याने विकासकामांचा धडाका लावत तालुक्यातील विकासाचा अनुशेष चांगल्यापैकी भरून काढला आहे.
तालुक्यातील अनेक नेतृत्वांना अशक्य वाटणारी विविध विकासकामे त्यांनी अगदी सहजतेने मार्गी लावल्याने तालुक्यातील जनतेत एक हुशार, अभ्यासू व कामाचा माणूस म्हणून त्यांची छबी निर्माण झाली आहे, असे मत भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केले आहे.

खासदार विखेंच्या सहकार्याने कान्हूर पठार पंचायत समिती गणासह संपूर्ण तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा राहिला असून, ९ मार्चला कान्हूर पठारसह गणातील विविध गावांत सव्वा नऊ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचेही कोरडे यांनी यावेळी सांगितले.
भूमिपूजन होणार असलेल्या कामांपैकी विरोली ते जाधववाडी व पारनेर-कान्हूर पठार रस्ता ते हत्तलखिंडी या रस्ताकामांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. या दोन रस्त्यांसाठीच आठ कोटी रुपये निधी मंजूर करून दिल्याने स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचेही त्यांनी सांगितले.