दोन-तीन वर्षापासून शहरातील बहुतांश सिग्नल बंद असल्याने वाहतुकीचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. या कालावधीत अनेकांचे बळी गेले तर अनेकांना अपंगत्व आले आहे. उड्डाणपुल होऊन वर्ष उलटले तरीही उड्डाणपुलाखालील सिग्नलही अद्याप सुरु झालेले नाही.
याबाबत वेळोवेळी प्रशासनास निवेदन, निषेध करुन सिग्नल सुरु करण्याची विनंती केली. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका बसत आहे. प्रशासन आणखी किती बळी घेणार असा सवाल करत पुढील १५ दिवसांत सिग्नल सुरु न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी दिला.

शहरातील बंद पडलेले व उड्डानपुलाखालील सिग्नल तातडीने सुरु करावेत. या मागणीसाठी शहर शिवसेनेच्या वतीने चांदणी चौकातील सिग्नलला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, योगीराज गाडे,
संतोष गेनप्पा, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, पप्पू भाले, महेश शेळके, संदिप दातरंगे, श्रीकांत चेमटे, जालिंदर वाघ, अण्णा घोलप, विशाल वालकर, रावजी नांगरे, उमेश काळे, दिपक भोसले आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, सिग्नलअभावी शहरातील वाढते अपघात ही चिंतेची बाब असून, शहरातील नागरिकांचे रस्त्यावरुन चलणे मुश्कील झाले आहे. तर शहरातील सिग्नल सुरु करण्याबाबत आयुक्तांनी तातडीने निर्णय न घेतल्यास शिवसेना महिला आघाडीच्यावतने आयुक्तांना साडी-चोळी देण्याचा इशारा स्मिता अष्टेकर यांनी दिला.