नागरिकांचा आ. पाचपुते यांना सवाल: ३५ वर्षे आमदार ११ वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात जे जमले नाही ते आता काय करणार?

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : आमदार पाचपुते यांनी विधानसभा आल्या की श्रीगोंदा तालुक्यात एमआयडीसी करण्याची घोषणा करतात. मात्र प्रत्यक्षात ती केवळ घोषणाच ठरते. आता सुद्धा पाचपुते हे एमआयडीसीचे गाजर दाखवत आहेत. तसेच ती एक वर्षात होईल असे सांगत आहेत. मात्र ते पूर्ण होणार की पुन्हा गाजर दाखवणार हा देखील मोठा प्रश्न आहे.

मात्र दुसरीकडे श्रीगोंदा तालुक्यात ३५ वर्षे आमदार ११ वर्षे मंत्रिपद असूनही तालुक्यातील तरुणांसाठी अद्यापही रोजगार उपलब्ध नाही. हे वास्तव मात्र ते विसरतात. त्यामुळे ३५ वर्षे आमदार ११ वर्षे मंत्रिपद असताना त्यांना जे जमले नाही ते आता कसे करणार अशी त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

एकाच मतदारसंघाचे विधानसभेत अनेक वर्षे प्रतिनिधीत्त्व करणारे जिल्ह्यातील जे काही ज्येष्ठ आमदार आहेत. त्यात आ. पाचपुते यांचे नाव आघवाडीर आहे. चळवळीतील कार्यकर्ता असलेले पाचपुते यांनी नंतर सत्तेची कास धरणे पसंत केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजप, असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. २००९ पूर्वी मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. पालकमंत्री असताना त्यांनी नगरकरांना आराखड्याचे तर श्रीगोंदेकरांना एमआयडीसीसह अनेक आमिषे दाखविले.

पाचपुते यांनी औटेवाडी येथे कृषी महाविद्यालय मंजूर केल्याचे जाहीर केले त्यानंतर काही दिवसातच मंजूर झालेले महाविद्यालय राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील हळगाव येथे नेले. शहरातील ग्रामीण रुग्णालयाची मोठी दुरावस्था आहे.

उपजिल्हा रुग्णालयाचे आश्वासन देखील हवेतच विरले असून तालुक्यासह शहरात पाचपुतेंनी मागे कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पण त्यातही ठेकेदारकडून टक्केवारी घेतल्याचे पाचपुते कुटुंबंवर गंभीर आरोप करण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनु असलेल्या कुकडीच्या पाण्याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांवर कायम अन्याय झाल्याचे चित्र पाचपुते सत्ताधारी आमदार असुनसुद्धा तालुक्याला पाणी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजगी आहे.

लोकसभेला आ. पाचपुते हे सत्ताधारी आमदार असूनसुद्धा श्रीगोंदा तालुक्यातून खासदार निलेश लंके यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले श्रीगोंदा तालुक्यातून विखे पिछाडीवर राहिले. यात पाचपुते यांच्यावर तालुक्यातील नाराज असलेल्या मतदारांचा फटका विखे यांना बसला असून त्यांचा पराभव झाल्याचे राजकीय जानकर सांगतात. शेजारी कर्जत तालुक्यात एमआयडीसी मंजूर झाली देखील मात्र श्रीगोंद्याला कधी असा सवाल नागरिक विचारात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe