उंबरे येथे एकाला गजाने मारहाण…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेती व सामायिक घराच्या वादातून प्रवीण गायकवाड यांना कोयता, गज व दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी घडली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की प्रविण शहाराम गायकवाड (वय २७ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील उंबरे येथे राहतात. त्यांचा चुलत भाऊ दिपक ज्ञानदेव गायकवाड या दोघांमध्ये सामाईक शेती व सामाईक घराच्या कारणावरुन वाद असुन त्यामुळे दिपक गायकवाड हा नेहमी वाद घालत असतो.

दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास प्रवीण गायकवाड व त्यांच्या आत्याचा मुलगा भारत पेत्रस साळवे हे दोघे शेतामध्ये गप्पा मारत बसलो होते. तेव्हा तेथे आरोपी हातात कोयता व गज घेऊन आले व म्हणाले, तु इकडे कशाला आला असे म्हणुन आरोपींनी प्रवीण गायकवाड यांना कोयता, गज व दगडाने मारहाण केली.

त्यावेळी भारत पेत्रस साळवे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनादेखील शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. तसेच तुला आता सोडणार नाही, तुला आता आम्ही खलासच करतो. तुझ्यावर बलात्काराची व छेडछाडीची केस करतो,

अशी धमकी दिली. घटनेनंतर प्रविण शहाराम गायकवाड यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दिपक ज्ञानदेव गायकवाड, रत्ना भाऊसाहेब औताडे, अंजली ऊर्फ अंजना दीपक गायकवाड,

ज्ञानदेव नामदेव गायकवाड (सर्व रा. उंबरे, ता. राहुरी) या चार जणांवर गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७५/२०२४ नुसार भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe