महाराजांच्या विचारांना मानणारा व्यक्ती शिवप्रेमींची फसवणूक कदापी सहन करू शकत नाही !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसर नूतनीकरणासाठी आमदार निधीतून एक छदाम देखील खर्च केला नाही. मनपाने यासाठी सुमारे १ लाख ५५ हजार रकमेचा ठेका ५ जानेवारीला दिला.

मनपाची ऑर्डरच काँग्रेसच्या वतीने समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली.

काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या खर्चातून म्हणजेच अहमदनगर वासीयांच्या वतीने जमा करण्यात आलेल्या कररूपी पैशातून श्रद्धेय महाराजांचा पुतळा व परिसराचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

यामध्ये आमदारांच्या आमदार निधीतून त्यांनी एक छदाम देखील उपलब्ध करून दिलेला नाही. मात्र, महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खर्चातून केलेल्या कामात राजकारण करत

आपली राजकीय पोळी त्यांनी भाजून घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारा व्यक्ती अशा प्रकारे शिवप्रेमींची फसवणूक कदापी सहन करू शकत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe