अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस जोडे मारून केले आंदोलन

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यातील महायुती सरकार आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांबाबात टोलवाटोलवी करत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक आयटक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक आयटक संघटनेच्या वतीने गेली ४७ दिवस बेमुदत संप सुरू आहे. १० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी यांनी ठिय्या आंदोलन केले.

सलग दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आझाद मैदान मुंबई येथे आशा व गटप्रवर्तक ऊन, वारा, पाऊस या सर्व संकटांना तोंड देत ठाण मांडून मुक्कामी असन, राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाचा आदेश काढावा, या मागणीवर ठाम भूमिका घेतली आहे.

राज्य सरकार टोलवाटोलवी करत असल्याने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर नेते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांची टिंगल टवाळी करत आहेत. या सर्व घटनेचा शेवगाव तालुका अशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

या वेळी आशा व गटप्रवर्तक संघटनेचे राज्याचे नेते कॉ. संजय नांगरे, कॉ. गोरक्षनाथ काकडे, बाबूलाल शेख, बाबूलाल सय्यद, सुवर्णा देशमुख, मंगल चव्हाण, आशा गांडुळे, वैशाली देशमुख, छाया घुले, सुनंदा चेमटे, पुनम गायकवाड, इंदू साबळे, अस्मिता माळी, आलका पाचे, सविता काकडे, कविता बटुळे, तारा आव्हाड, मंदा नागरे आदींसह आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe