अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- आजवर अनेक मोठ्या नेते मंडळीचे आपण पुतळे पाहिले आहेत. त्यांनी त्यांच्या काळात जनतेसाठी केलेल्या भरीव कामाची त्यांच्या पश्चात जाणीव व्हावी. त्यांचा वारसा पुढे असाच सुरु राहावा असा त्यामागील उद्देश असतो.
मात्र एका जिल्हा परिषद सदस्याचा पुतळा क्वचित प्रसंगी उभारला जातो.असाच नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य स्व. अनिल कराळे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य स्व.अनिल कराळे पाथर्डी तालुक्याची शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून या तालुक्यात परिचित होती.
शिवसैनिक ते उपजिल्हाप्रमुख, गावचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य अशा विविध पदावर त्यांनी काम करून सर्वसामान्य जनतेशी आपली नाळ जोडली होती.
मात्र दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत, मात्र त्यांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी कामत शिंगवे ग्रामस्थांसह शिवसैनिकांच्या इच्छेप्रमाणे गुरुवारी त्यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.गाडे यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम