उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या विद्यार्थिनीवर डॉक्टरकडूनच अत्याचार : श्रीरामपूरातली घटना !

Published on -

आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या एका विद्यार्थिनीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याविरोधात येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील एका मुलींच्या वसतीगृहावर असताना आजारी पडल्याने रेक्टर व मैत्रीण, अशा आम्ही तिघी डॉ. कुटे यांच्या रुग्णालयात गेलो. तेथे कर्मचारी महिलेने तरुणीला ओपीडीत नेले. तेथे डॉ. रवींद्र कुटे आले. त्यांनी विचारपूस केली व झोपण्यास सांगितले.

तेव्हा डॉ. कुटे यांनी तपासणी करताना नको त्या ठिकाणी हात लावून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून अत्याचार केला. तेव्हा मैत्रीण व रेक्टर मदतीला आल्या असता तेथील कर्मचारी महिलेने व डॉक्टर कुटे यांनी शिवीगाळ केली व झाडूने मारले.

यावेळी पीडिता व तिच्या सोबतच्या दोघी प्रचंड घाबरून होत्या. याप्रकरणी पीडीत विद्यार्थिनीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपी डॉ. रवींद्र कुटे व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता डॉ. कुटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची पडताळणी करून आरोपींना ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News