चोरट्यांचा धुमाकूळ ! एकाच रात्री तब्ब्ल आठ घरे फोडली

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी व आंबी-दुमाला गावात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. म्हसवंडी येथील सात बंद घरे तर आंबी दुमाला येथील एक घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली.(Ahmednagar Crime)

यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये कमालीचे दहशत पसरलीआहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील म्हसवंडी येथे मंगळवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत लक्ष्मी बाबुराव बोडके, रवींद्र उध्दव इथापे,

बळीराम कारभारी बोडके, गुलाब गोविंद बोडके, अशोक कारभारी बोडके, बाळासाहेब कारभारी बोडके या सर्वांची घरे फोडून मोठा ऐवज चोरून पोबारा केला.

त्यानंतर पुन्हा चोरट्यांनी आंबीदुमाला येथील सुमन रंगनाथ जाधव यांचेही घर फोडून दागिने चोरून पोबारा केला. सर्वच ठिकाणी बंद असलेल्या घरांच्या दरवाजाची कडी व कोयंडा तोडून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान याबाबत माहिती समजताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी घेत पोलिसांनी चोरट्यांनी फोडलेल्या घरांची पाहणी केली.

त्यानंतर ठसेतज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. दरम्यान शांताराम रामू बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe