अहमदनगर दौंड महामार्गावर भीषण अपघात ! गाडीवरचा ताबा सुटला आणि…

Published on -

Ahmednagar News : नगर -दौंड महामार्गावरील घारगाव परिसरात माल वाहतूक पिकअपचा जॉइंट तुटून वाहनावरील ताबा सुटल्याने माल वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी करणाऱ्या वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले.

अपघातात दोन्ही चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाब मुस्ताप शेख, मुस्ताप शेख, बाबर गुलाब शेख तिघे रा. पिंपळगाव फुणगी, ता. राहुरी, सागर भिमाजी फुले रा. केडगाव, ता. दौंड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसारः केडगाव, ता. दौंड येथील प्रवीण जगताप यांच्या चारचाकी मालवाहतूक करणाऱ्या पिकअप क्र.एम एच ४२ ए क्यू ९६५८ मध्ये गाडीचा ड्रायवर सागर भिमाजी फुले रा. केडगाव, हा गूळ भरून नगरकडे येत असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास

तालुक्यातील घारगाव येथील निलगिरी धाव्याच्या परिसरात गाडीचा जॉइंट तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन नगरकडून काष्टी येथील जनावरांच्या बाजारात जाणाऱ्या चारचाकी छोटा हत्ती गाडी क्र.एम एच १२ ई क्यू ९०४१ या वाहनाला समोरासमोर जोराची धडक दिली.

या भीषण धडकेत चारचाकी छोटाहली गाडीचे मोठे नुकसान होऊन गाडीतील गुलाब मुस्ताप शेख, मुस्ताप शेख, बाबर गुलाब शेख तिघे रा. पिंपळगाव फुणगी, ता. राहुरी हे तिघे जण आणि पिकअपचा चालक सागर भिमाजी फुले रा. केडगाव, ता. दौंड हे गंभीर जखमी झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe