सोनाराच्या दुकानात चोरट्याचा डल्ला; दागिने केले लंपास

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- एका सोनाराच्या दुकानात घरफोडी करून चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावामध्ये घडली आहे.

याप्रकरणी उमेश जनार्दन लोळगे (वय 45, रा. वाळकी) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, लोळगे यांचे वाळकीमध्ये सोनाराचे दुकान आहे.

सायंकाळी काम आटोपून त्यांनी दुकानाला कुलूप लावून ते व्यवस्थित बंद केले हेाते. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला.

आतील सामानाची उपकापाचक करून सुमारे 35 हजार रुपयांचे चांदीच्या बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू चोरून नेल्या. या घटनेची माहिती समजताच पोलीस पथकाने घटनास्थळी पाहणी केली.

दरम्यान याप्रकरणी लोळगे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe