संगमनेरातील नेहरू गार्डनमधील रेल्वेला अपघात; एक बालक गंभीर जखमी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील नगरपरिषदेच्या नेहरू उद्यानामधील लहान मुलांसाठी असलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये सात वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या न्यायालयासमोर संगमनेर नगरपालिकेचे नेहरू उद्यान आहे. या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही वर्षांपूर्व रेल्वे घेण्यात आली आहे. दररोज सायंकाळी शहरातील अनेक लहान मुले या रेल्वेत बसण्याचा आनंद लुटतात.

काल रविवारी सायंकाळी ही रेल्वे गाडी लहान मुलांना घेऊन जात असताना अचानक अपघात झाला. रेल्वे रुळावरून खाली घसरल्याने विराज मारुती शिंदे (वय ७, रा. संजय गांधी नगर, संगमनेर) हा बालक गंभीर जखमी झाला.

त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबत मुख्याधिकारी वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या अपघाताच्या वृत्तास दुजोरा दिला. या घटनेची आपण माहिती घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe