अहमदनगर पुणे महामार्गावर सळईने भरलेला ट्रक थेट घूसला घरात ! मोठ्याने आवाज झाला आणि…

Ahmednagarlive24 office
Published:

नगर -पुणे महामार्गावर नारायणगव्हाण येथे आज (दि.११) पहाटे पाचच्या सुमारास सळईने भरलेला ट्रक एका घराला धडक देऊन विजेच्या पोलवर जाऊन आदळला. या वेळी चालक ट्रकची काच फोडून बाहेर पडला.

बेशुद्ध अवस्थेत त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. ट्रक विजेच्या पोलवर आदळल्यामुळे पोल वाकला असून, वीजपुरवठा बंद झाला. अपघाताचा मोठ्याने आवाज झाल्यामुळे घरातील संगीता शेळके यांना मोठा मानसिक धक्का बसला, त्यांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले.

सकाळी या ठिकाणी अनेक शालेय विद्यार्थी उभे असतात; सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. रविवारी ग्रामस्थांनी सहयाची मोहीम सुरू केली असून, सोमवारी (दि.१८) रोजी सा. बां. विभागाला चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याबाबत निवेदन देणार आहेत.

१८ डिसेंबरपर्यंत निवेदनाची दखल न घेतल्यास २ जानेवारीला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सचिन शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe