Ahmednagar News : मोबाईल ब्लॉक केल्याच्या कारणावरून महिलेसह तिच्या मित्राला दोघांनी कोयत्याने मारहाण केल्याची घटना काल मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास शहरालगतच्या मालपाणी हेल्थ क्लब जवळ घडली.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील मालपाणी हेल्थ क्लब जवळ राहणारी महिला आपल्या मित्रासोबत घरी असताना जवळच राहणारा राजेश जंबुकर व त्याचा मित्र सदर महिलेच्या घरी आले.
‘तु माझा मोबाइल नंबर ब्लॉक का केला’, असे विचारून जंबुकर याने त्याच्या हातातील कोयत्याने सदर महिलेच्या दोन्ही हाताचे बोटावर व डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले. त्याच्या मित्राने हातातील लाकडी दांडा सदर महिलेचा मित्र विलास काळे याच्या गुडघ्यावर मारला.
त्याने लाथाबुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेश जंबुकर पुर्ण नाव माहिती नाही व वैभव पूर्ण नाव माहित नाही (दोघे रा. ढोलेवाडी, संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल धनवट करीत आहे.