Ahmednagar News : केदारनाथ- बद्रिनाथ देवदर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या एका वाहनावर दरड कोसळल्याने श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील पुष्पा मोहन भोसले (वय ६२) यांचा मृत्यू झाला आहे.
तर राम साळुंके (३८ वर्ष) रा. हिरडगाव (ता. श्रीगोंदा) यांच्यासह ९ प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये तीन प्रवासी हे नगर जिल्ह्यातील आहेत.या बाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंद्यातील काष्टी येथील पुष्पा मोहन भोसले, संगिता चंद्रशेखर पाचपुते, सुशिलाबाई वसंतराव वाबळे, हेमा विलास जाधव, नंदा अरुणराव भोसले व आणखी ५ महिला अशा १० महिला सर्व एकमेकांचे नातेवाईक हे केदारनाथ-बद्रिनाथ देवदर्शनासाठी १५ जूनपासून गेले होते व ते ८ जुलैला परत येणार होते.
दरम्यान २९ जुन रोजी देवदर्शन झाल्यानंतर डोंगरावरून परत खाली येतांना या ग्रुप मधील ९ महिला पायी येत होत्या, तर मयत पुष्पा भोसले व रामा सांळुखे व अन्य ९ जण एका वाहनाने खाली येत असताना केदारनाथ यात्रेचा मुख्य थांबा असणार्या मुकटिया येथे डोंगराच्या माथ्यावरून कोसळलेल्या ढिगार्या यांचे वाहन सापडले. या अपघातात संबंधीत मयत आणि जखमी झाले आहे.
या अपघातात कृष्णा भाले (वय १२, रा.नगर), ज्योती बाळासाहेब काळे (वय ४०, रा. नगर), कल्पना रंगनाथ काळे (वय ५९, रा. कर्जत, नगर), राम साळुंके (वय ३८, हिरडगाव ता. श्रीगोंदा जिल्हा नगर) तर बिहार मधील सहा जण जखमी झाले आहेत.