मालवाहतूक ट्रकच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- दुचाकी व मालवाहतूक ट्रकच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राहुरी फॅक्टरी परिसरातील वाणीमळा येथे नगर-मनमाड महामार्गावर घडली आहे.

विशेषबाब म्हणजे या महामार्गाने आठवडाभरात एक महिला आणि दोन तरूण अशा तिघांचा बळी घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

वाणीमळा येथील दूध उत्पादक शेतकरी प्रभाकर खांदे व त्यांची पत्नी विमल दुचाकीवरून मुलीच्या घरी पित्र जेवणासाठी चालले होते.

दरम्यान नगर-मनमाड महामार्गावर पाठीमागून आलेल्या मालवाहतूक ट्रकने खांदे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या विमल खांदे (वय-42) जागीच ठार झाल्या.

तर त्यांचे पती प्रभाकर खांदे किरकोळ जखमी झाले आहेत. रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे नेण्यात आला. दरम्यान, मध्यप्रदेश राज्यातील मालवाहतूक ट्रक चालकास पाठलाग करुन त्यास गुहा येथे पकडले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News